Share

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सौरभ राव

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक काल जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड-19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच अचूक, शास्त्रोक्त व समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!