सांगली – इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त टेस्टींग होत आहेत. काही राज्यात टेस्टींग नसल्याने रुग्ण दगावत आहेत मात्र आमच्या राज्यात आम्ही हे होऊ देणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
दरम्यान केंद्रसरकारकडून ज्याप्रमाणात लसी येतील त्या तात्काळ नागरिकांना दिल्या जातील असा विश्वास जयंत पाटील यांनी जनतेला दिला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील रुग्णालये, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधांचा साठा या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. नागरिकांना बेड्सची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन व्यवस्था निर्माण केली आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली. लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राज्यात अधिक लस पुरवावी ही राज्यसरकारची मागणी असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. येत्या दोन दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. शासनाने जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगतानाच काही पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळले आहेत. हे पुन्हा निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंबे खाऊन मुलगा होतो अशी विधाने करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाबाबत अफवा पसरवू नये’
- जालना; अवैध देशी दारूचे शंभर बॉक्स सहित दोन संशयित ताब्यात
- पुण्यातून बिहारला गेलेल्या प्रवाशांना अर्धा तास रेल्वेतच कोंडले, १७ प्रवासी पॉझिटिव्ह
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय?

