पटणा : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राज्यात दोन आठवड्यांचे कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे इतर राज्यातील कामगार आप-आपल्या गावी परत जात आहेत. मात्र, महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवशांची कडक तपासणी दिल्ली, बिहार सारख्या राज्यात होत आहे. यातच शनिवारी रात्री उशीरा बिहारमधील दानापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेल्या रेल्वेतील प्रवाशांना अर्धा तास रेल्वेमध्येच राहावे लागले.
ही रेल्वे पुण्यावरून शनिवारी रात्री दानापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा ४८ मिनिटे आधीच रेल्वे पोहोचल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज नव्हती. आधी आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्यानंतरच रेल्वे प्रवाशांची तपासणी करून त्यांना सोडण्यात आले. यामध्ये एकूण ५२४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी १७ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना लगेचच पाटलिपुत्र अशोक हॉटेल आणि सगुना चौफुलीवरील आयसोलेशन केंद्रात रवाना करण्यात आले.
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने बिहारी नागरिक घरचा रस्ता धरत आहे. यातील एका प्रवाशाने सांगितले की, लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे काम-धंद्यावर परिणाम झाला आहे. अशा वेळी जास्त कालावधीसाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कामगार घरचा रस्ता धरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील’
- उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा
- उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर फडणवीस काय करणार ?, राऊतांचा टोला
- ही’ कार बुक करण्यासाठी एसबीआय देत आहे बंपर ऑफर
- ‘रेमडेसिवीर भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय सुरू आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

