Share

‘आंबे खाऊन मुलगा होतो अशी विधाने करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाबाबत अफवा पसरवू नये’

Published On: 

🕒 1 min read

सांगली : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.

यामुळे या गंभीर स्थितीतून सावरण्यासाठी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मास्क लावणे म्हणजे मास्क लावण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे. यासोबतच पुढे त्यांनी अश्लाघ्य भाषेचा देखील वापर केला आहे.

याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिडे गुरुजींवर टीका करण्यात आल्या होत्या. तर त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. आता, ‘कोरोना हा आजार मुळात जगात नाहीच. केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. कोणत्या नालायकाने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे,’ असं वादग्रस्त भाष्य भिडेंनी केलं आहे.

त्यांच्या विधानाचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे. ‘असं विधान करणं हे निषेधार्ह आहे. हे फार मोठं संकट आहे. त्यामुळे अशी विधाने करून लोकांना दिशाहीन करणं हे अत्यंत चुकीचं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि समाज प्रयत्न करत आहे. मात्र अशी विधाने त्याला बाधा करत आहेत.’ असं जयंत पाटील म्हणाले.

या विधानावर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ‘भिडेंच्या विधानाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे. आंबे खाल्ल्यावर मुलगा होतो असं वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीचे लोक हे कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून ते सर्व व्यक्ती जे आवाहन करतायत त्या विरोधी आहे. कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!