🕒 1 min read
उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तसेच ऑक्सिजनचा प्रचंट तुटवडा भासत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असुन यंत्रणा अपुरी पडत आहे. उस्मानाबादेत सरकारी रुग्णालयात एकूण ४०८२ बेडची सोय आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी डॉक्टर आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ९०० आहे. मात्र, आणखी ६२२ कर्मचाऱ्यांची कमतरता असून, यामध्ये डॉक्टरांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळेच खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात सेवा द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. खासगी डॉक्टरांसाठी भरती प्रक्रियाही राबवण्यात आली. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड विभागात सध्या ४०० बेड असून, या सर्व बेडवर गंभीर स्वरूपातील रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत, यासाठी उपलब्ध यंत्रणा अत्यंत तळमळीने काम करत आहे. एका वार्डामध्ये २० रुग्ण असल्यास ४ ते ५ कर्मचाऱ्यांवर त्यांच्या उपचाराची जबाबदारी येते. अतिरिक्त ताण असला तरी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेमध्ये कमतरता भासू दिलेली नाही. दिवसरात्र एक करून कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना नेहमीच यश येईल, असे नाही. काही वेळा उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू ओढवतो.
सध्या ३ एमडी मेडिसीन असून, ४५ एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध आहेत. ही संख्या नवीन तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या व नियमित सेवेत असलेल्या डॉक्टरांची मिळून आहे. म्हणजेच अजून १०५ एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. आयुषच्या १५० डॉक्टरांची गरज अजून ४० पदे रिक्त आहेत. शहरातील तसेच ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांनी सरकारी रूग्णालयात सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला समोरं जावं, चौकशीअंती खरं-खोटं समोर येईल’
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानीचा चैञी पोर्णिमा उत्सव भाविकांविना साजरा
- आपली जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणं ही आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे – दानवे
- ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी एका नव्या पैशाचाही निधी मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
