Share

‘अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला समोरं जावं, चौकशीअंती खरं-खोटं समोर येईल’

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेते भाजपवर जोरदार टीका करत आहेत. आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेले आरोप पाहता देशमुख यांनी चौकशीला समोर जायला हवे, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.

विविध ठिकाणाहून पैसे गोळा करण्याचे आरोप पाहता पोलिसांच्या मध्यामतून हा मोठ्या खंडणीचा प्रकार आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे अधिकाऱ्यांनी केले आहेत, त्यामुळे विरोधकांकडे बोट दाखवणे योग्य नसल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला समोरं जावं. चौकशीअंती खरं-खोटं समोर येईल. त्यात काही तथ्य नसेल तर प्रश्नच राहणार नाही, असंही महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!