तुळजापूर –तालुक्यातील बोरी येथील शेतातुन ऐका शेतकऱ्याचे पंधरा दिवसात दोन रेडे किंमत पन्नास हजार रुपये चे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबतीत अधिक माहीतीअशी की, बोरी ता तुळजापूर येथील राजाभाऊ अण्णासाहेब भोसले या शेतकऱ्याचे बोरी शिवारात गट नआ 57मध्ये शेत आहे. यात गोठ्यात बांधलेल्या ऐक वर्षाचा रेडा किंमत दहा हजार .20/7/2020रोजी चोरुन नेला.
यावेळी मरीआईला नेला असेल असा समज करुन शेतकरी गप्प बसला. माञ नंतर 3/7/2020तर चोरट्यांनी कहरच केला चक्क गोठ्याची दगडी भिंत पाडून चार वर्षाचा चाळीस हजार रुपये किंमतीचा रेडा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.
यावेळी अज्ञात चोरट्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य ही चोरून नेले.या घटनेने सर्वञ खळबळ उडाली असुन शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले शेतकऱ्यांच्या शेतावर डल्ला मारणा-या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत पाटील
राज्यातील महिलांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार कधी जागे होणार ?
शंभर किलो पुस्तकांच्या ग्रंथतुलेतून ‘रिपाइं’तर्फे अण्णाभाऊंना अभिवादन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

