Share

राज्यातील महिलांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार कधी जागे होणार ?

Published On: 

अमरावती – कोरोनाच्या काळात राज्याची गंभीर परिस्थिती आहे.एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे तर दुसरीकडे महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. बडनेरा ट्रामा केअर सेंटर मध्ये घडलेली घटना ही निंदनीय आहे.राज्यात, इथे महिला सुरक्षित नाही.या सरकारच्या काळात महिला सुरक्षित कधी होणार? हे सरकार जागे कधी होणार? दिशा कायदा कधी अंमलात येणार ? आदी प्रश्नांची सरबत्ती करीत भाजपा महा. प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. त्या भाजपा कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी पत्रकार परिषदेला राज्य सरचिटणीस अर्चना डेहनकर, उपमहापौर नागपूर मनीषा कोठे, शहर अध्यक्ष किरण पातूरकर,जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी,भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी सभापती राधा कुरील, सुरेखा लुंगारे, शिल्पा पाचघरे, सुचिता बिरे,आदी उपस्थित होते.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, कोविड तपासणी सेंटर मध्ये महिला उपचाराला गेल्या असता अशा घटना घडत असतील तर मग आपली आई,बहीण जाणार कुठे? बडनेऱ्याची घटना दुर्देवी आहे. क्वॉरंटाईन सेंटर मध्ये नियमावली नाही.आम्ही बनविलेली नियमावली पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवू,असे सांगितले.

क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महिलांसाठी वेगळी व्यवस्था हवी
क्वॉरंटाईन सेंटर हे पुरुष,महिलांसाठी वेगवेगळे असायला पाहिजे. महिला क्वॉरंटाईन सेंटरची जबाबदारी पूर्णत: प्रशासनाकडे असावी. यामध्ये सफाई कर्मचारी, कामगार, टेक्निशियन, नर्स, डॉक्टर आदी महिलाच असायला पाहिजे.

तुम्ही तर डोळस आहात ना!
यशोमती ठाकूर म्हणतात,तुम्ही आंधळे आहात काय? अहो तुम्ही तर डोळस आहात ना, मग अशी घटना का घडते? विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व लक्षात आणून देऊ असे स्पष्ट केले. आज ज्या मुलीने ही घटना उघडकीस आणली तिचे व तिच्या परिवाराचे कौतुक चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केले. बडनेरा ट्रॉमा केअर घटनेला प्रशासना सोबतच इन्चार्ज डॉक्टर, सीएस जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी चित्रा वाघ यांनी केली.

राज्यात महिला सुरक्षित नाही आहे. राज्य सरकार दिशा कायदा आणतो म्हणाले? आम्ही त्याची वाट पाहत आहे. दिशा कायदा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये 50 टक्के महिला आहे. महिलांना संरक्षण कधी मिळणार? महाराष्ट्रासाठी हे प्रकार भूषणावह नाही. बलात्कार घटना कधी थांबणार? लक्षात आणून देणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. आम्ही कोरोनावर टीका करीत नाही. आम्ही हातात हात घालून काम करू असे देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत पाटील

अशुभ मुहुर्तावर भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात?

अयोध्येच्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात;संभाजी भिडे यांची मागणी

…तर मी खासदारकीचा राजीनामा देतो – सुजय विखे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!