Share

कोल्हापुरातील ‘पाणीपुरी’चं सत्य अखेर उघडकीस! वाचा काय आहे प्रकरण

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर – २ दिवसांपूर्वी कोल्हापुरातील पाणीपुरीच्या दर्जाबद्दल एका व्यक्तीने चित्रित केलेला व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि पाणीपुरी खवय्यांना धक्का बसला. कोल्हापुरातील रंकाळा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटक देखील या रंकाळा तलावास आवर्जून भेट देतात.

कोल्हापूर हे शहर तसं ऐतिहासिक वैभवाचं, पैलवानांचं, रांगड्या मातीचं यासोबतच निसर्गाने दिलेल्या पर्वणीचं. याच ओळखीमुळे तांबड्या-पांढऱ्यासोबतच खवय्यांसाठी खास ठिकाण बनलं आहे. दोन दिवसांपूर्वी रंकाळा तलाव परिसरातील एका पाणीपुरी गाड्यावर चक्क शौचालयाचं पाणी वापरलं जातं अशी एक व्हिडीओ व्हायरल झाली. मग कोल्हापूरकरांनी देखील त्या गाडा चालकाला दणका देत पाणीपुरीचा गाडाचं फोडून टाकला.

मात्र, आता या व्हिडिओवर प्रश्न निर्माण होऊन या पाणीपुरीच्या पाण्याचं सत्य बाहेर आलं आहे. स्वच्छतागृहातील टाकीच पाणी लोकांना पिण्यासाठी दिलं जात असं या व्हिडिओतून दिसत होतं. पण सजग नागरिकांनी आणि पोलिसांनी या पाण्याची सत्यता समोर आणली आहे. ज्या नळातून त्या पाणीपुरी गाड्यावरील माणसाने पाणी घेतलं तो नळ जरी स्वच्छतागृहा जवळील असला तरी तो नळ महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य लाईनला जोडला गेल्याचं या जगर नागरिकांनी समोर आणलं आहे.

त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ न करता पिण्यायोग्य पाणीच दिलं जात होतं असं सत्य समोर आलं आहे. इतकंच नाही तर या नागरिकांनी त्या नळाचं पाणी पिऊन दाखवत लोकांना विश्वास बसून निर्माण झालेला गैरसमज दूर व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे. अनेक खाऊच्या गाड्या या परिसरात लागतात. या व्हिडीओमुळे चुकीचा संदेश जाऊन ग्राहकांवर परिणाम होऊ नये म्हणून समोर आणलेलं हे सत्य महत्वाचं आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन स्थळाची पाहणी केली. सदरची पाण्याची लाईन ही थेट जोड असल्याचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लक्षात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी व स्थानिक रहिवाश्यांनी याबद्दल खुलासा केला आहे की, सदरच्या पाण्याचा नळ हा हे थेट महापालिकेच्या पाण्याच्या लाईनला जोडलेला आहे फक्त सदरचा नळ हा शौचालय शेजारी असल्यामुळे गैरसमज पसरला आहे. अधिकाऱ्यांनी सदरचा नळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!