Share

अजब सरकार गजब निर्णय, शौमिका महाडिकांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

Published On: 

कोल्हापूर : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.

आता, जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक सामान्य लोकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक फटका सहन करत खाजगी वाहनांची सोय करून ई-पासचे बंधन देखील पाळावे लागत होते. सरकारने आता चांगली खुशखबर दिली असून वाढती मागणी पाहता जिल्हाबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, एसटी वाहतूक देखील खुली होणार असून खाजगी वाहनाने प्रवास करताना मात्र ई-पास लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी आज हि सुरु असलेल्या एसटीने आता सर्वसामान्य नागरिकांना देखील प्रवास करता येणार आहे.

गेल्या २४ तासांत देशभरातील कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

एसटी महामंडळाची आंतरजिल्हा बस वाहतूक आज पासून सुरु करण्यात आली असून प्रवाशांचा प्रतिसाद हा कमी असल्याचे अनेक भागात दिसून आले. तर, एसटी वाहतूक केल्यानंतरही खाजगी वाहनांतून ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. यावरूनच भाजपा नेत्या व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मोठी बातमी: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

” 21 अनोळखी लोकं एका सार्वजनिक वाहनातून जाऊ शकतात, मात्र एकाच परिवारातील व्यक्ती वैयक्तिक चारचाकी अथवा दुचाकी वापरून #परवानगी शिवाय कुठेही जाऊ शकत नाहीत. #अजब_सरकार_गजब_निर्णय”, असे ट्विट करत खाजगी वाहनांसाठी अजूनही ई-पासची करण्यात आलेल्या सक्तीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, राज्यातील ‘हे’ शहर आहे तिसऱ्या स्थानी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!