Share

मोठी बातमी: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

Published On: 

आझमगड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझमगड येथील सरपंचाच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री नितीन राऊत हे उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे गेले आहेत. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सीमेवरच थांबवले.

यानंतर, तेथे काही काळ तणाव निर्माण झाला असून युपी सरकारवर टीका केली जात आहे. नितीन राऊत हे स्वतःच्या गाडीने उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे रवाना झाले होते. परंतु, आझमगड सीमाभागात पोहोचल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले व पुढे जाण्यास मनाई केली.

‘मोहरम’साठीची नियमावली जाहीर

पोलिसांनी रोखल्यामुळे चक्क मंत्री नितीन राऊत यांनी रस्त्यावरच कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. यामुळे तणाव निर्माण झाल्याच्या कारणाने आता उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आता युपी पोलीस विरुद्ध महाराष्ट्र सरकार असे वाद पेटण्याचे शक्यता आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिले आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, राज्यातील ‘हे’ शहर आहे तिसऱ्या स्थानी

यानंतर आता, युपी काँग्रेसने ट्विट करत पत्रकार परिषदेची माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री व काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांची आझमगड सर्किट हौस येथे उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले आहे.

दिल्ली दौरा फळाला लागला, विखे- कर्डीलेंचे मनोमिलन ?

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!