नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत उच्चांकी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देखील वाढत असले तरी गेले अनेक दिवस पन्नास ते साठ हजारांवर वाढ होणारी रुग्णसंख्या देखील चिंतेची बाब बनत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या बाबतीत माहिती दिली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार ६५२ इतक्या उच्चांकी नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा २८ लाख ३६ हजार ९२५ वर पोहोचला आहे. तर, ५८ हजार ७९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत एकूण २० लाख ९६ हजार ६६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
◾ 28,36,925 total confirmed cases
◾ 20,96,664 cases cured/recovered
◾ 3,26,61,252 samples testedHere's the State-wise distribution of #COVID19 cases in the country (as on 20 August 2020)#IndiaFightsCorona pic.twitter.com/nt97K7iG3r
— PIB India (@PIB_India) August 20, 2020
मोठी बातमी: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात
यासोबतच, ९७७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या ५३ हजार ८६६ वर गेली आहे. देशात सद्या ६ लाख ८६ हजार ३९५ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत तब्बल ३ कोटी २६ लाख ६१ हजार २५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यात काल, १३ हजार १६५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, नवीन 9011 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 446881 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

