Share

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, राज्यातील ‘हे’ शहर आहे तिसऱ्या स्थानी

Published On: 

नवी दिल्ली- केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत  या स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून सलग चौथ्या वर्षी इंदोर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे.

नवी मुंबई महापालिका यावर्षी तिसऱ्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर पुणे शहर मागील वर्षी राज्यात 8 व्या क्रमांकावर होते ते यंदा चौथ्या क्रमांकावर आहे.या सर्व्हेक्षणात मध्ये प्रदेशातील चार शहरांनी भाग घेतला होता आणि या 4 ही शहरांचा पहिल्या 20 मध्ये समावेश आहे.राज्यातील  नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहर देशात 15 व्या क्रमांकावर आले आहे. मागील वर्षी शहराचा क्रमांक 37 वा होता.स्वच्छ भारत सर्व्हेक्षणात 2020 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे. या पाच शहरांपैकी नवी मुंबई तिसऱ्या तर नाशिक 11 व्या स्थानावर आहे.राज्यातून चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. 2019 पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट होते.

महत्वाच्या बातम्या- 

आनंदाची बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शनिवार, रविवारची संचारबंदी कायमस्वरुपी बंद

सुशांतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!