मुंबई : महाविकास आघाडी सरकारने दारुची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली आहे. शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे. असे राज्य शासनाने म्हंटले आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली.
महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा..
एक्साईज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोसाहित करण्याचे काम हातात घेतले आहे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 21, 2021
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्र सरकारने दारूवरची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली. महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा. एक्साईज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोसाहित करण्याचे काम हातात घेतले आहे.
उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल. सध्या एका दिवसात १ लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते. असे राज्य सरकारने म्हंटले आहे.
राज्य सरकारने स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- महाविकास आघाडीचे फसवे आकडे, भाजपचाच…; चंद्रकांत पाटलांचा दावा
- …म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते- संजय राऊत
- ‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

