मुंबई- यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. असे केल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते असा अजब दावा टोपे यांनी केला आहे.
टोपे म्हणाले, खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत. खाजगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबई महापालिकेने एक पत्रक काढून चाचणी केंद्रांना मार्गदर्शक सूचना दिली आहे. यामध्ये एखाद्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर ते रुग्णाला न कळवता थेट महापालिकेला कळवा असा अजब फतवा काढण्यात आला आहे.
मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत नितीन सरदेसाई म्हणाले की, मुंबई महापालिका आयुक्तांचा हा आदेश वाचल्यानंतर मनात काही शंका आल्या आहेत. स्वत:चा रिपोर्ट मिळणे हा रुग्णाचा अधिकार कसा काय हिरावून घेऊ शकता? त्याचसोबत महानगरपालिकेच्या एकूण कामाची पद्धत पाहता त्या पॉझिटिव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची? कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशी शंकाही मनसेने उपस्थित केली आहे.
चीन विरोधात संतापाची लाट, शिवसैनिकांनी केली चीनच्या राष्ट्रध्वजाची होळी
खासगी रुग्णालये तात्काळ सुरू करा अन्यथा… राजेश टोपेंनी दिला सज्जड दम
रुग्णसेवा द्यावी की नाही? रुग्णालय प्रशासनाचा पालिकेला थेट सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

