Share

चीन विरोधात संतापाची लाट, शिवसैनिकांनी केली चीनच्या राष्ट्रध्वजाची होळी

Published On: 

कोल्हापूर- चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केल्याची घटना काल समोर आली आहे. भारतीय सैनिकांच्या बलिदानानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर शिवसेनेच्यावतीनेही आज कागल येथे चीन विरोधात निदर्शने करण्यात आली. चीनच्या राष्ट्रध्वजाची जाहिर होळी करुन, तीव्र संताप व निषेध व्यक्त करण्यात आला.

चीनच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन चीनच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. यावेळी शिवसैनिकांनी चीन मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. चीनच्या या भ्याड हल्ल्याला भारत सरकार योग्य ते उत्तर देईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केला. तर यासाठी भारत सरकार आणि आपल्या सैन्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक सदैव तत्पर राहतील असा विश्वास जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकाबाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला या प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीला सर्व पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहतील.

बच्चू कडू अॅक्शन मोडमध्ये, वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवण्याचे दिले आदेश

‘त्याच’ दिवशी झाला चीनी कंपनीसोबत ठाकरे सरकारचा ७,६०० कोटींचा करार

हा १९६२चा नाही २०२०चा नवा भारत आहे, चीनला थेट धमकी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!