मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करण्याची मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. आधी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागतोय, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय. शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे, त्यामुळे त्याला आर्थिक दृष्ट्या खंबीरपणे उभे करण्यासाठी राज्य सरकारने राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
सरकारकडे पैसे नसल्यास एक वर्षासाठी मंत्री, आमदार खासदार, यांचे पगार थांबवा अथवा नुकसानीचा दौरा करण्यासाठी मंत्र्यांच्या दौऱ्या वर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, तो खर्च टाळण्यासाठी दौरे रद्द केले तरी हरकत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत पोहोचवा, केंद्र सरकार ने आपत्कालीन परिस्थितीमध्ये गुजरात राज्याला जशी मदत केली तशीच महाराष्ट्राला देखील करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

