🕒 1 min read
दिल्ली : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने घातलेल्या संसर्गामुळे शिक्षणक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा, महाविद्यालये पूर्णतः नियमितपणे सुरु करण्यात आलेले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या आधारावर दहावी व बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.
यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने दहावीच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
तर, बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला असून शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी अनेक विद्यार्थी आणि पालकांनी गेल्या अनेक दिवसांपासून उचलून धरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे.
दरम्यान आता सीबीएसई 12 वीची बोर्ड परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वस्तुनिष्ठ पध्दतीच्या लॉजिकनुसार जाहीर करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) इयत्ता 12 वीची परीक्षा 4 मे ते 14 जून दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र, कोविड 19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘4 मे ते 14 जून या कालावधीत होणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा नंतर घेतल्या जातील. 1 जून रोजी मंडळामार्फत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि नंतर तपशील जाहीर केला जाईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 15 दिवसांची नोटीस दिली जाईल.’ असे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी CBSE इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेत बोर्ड परीक्षा रद्द करण्याची विनंती करत हॅशटॅग #saveboardstudents या नावाने ऑनलाईन मोहीम सुरू केली होती. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी Change.org वर एक याचिका देखील दाखल केली आहे, ज्यामध्ये सरकारकडे 12 वी वर्ग बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भूमीपूजन कार्यक्रम! मंत्री भुमरेंचा माफीनामा खंडपीठाने नाकारला
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

