🕒 1 min read
दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याने विविध लस भारतात आयात करण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही ही कोरोना प्रतिबंधक लस १ मे रोजी भारतात दाखल झाली असून दुसरी खेप देखील आज पोहोचणार आहे. तर, या लसींची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे.
दरम्यान, स्पुटनिक लसीची किंमत आज जाहीर करण्यात आली आहे. भारतात या लसीच्या एका डोसची किंमत ९४८ रुपये इतकी ठरवण्यात आली असून त्यात अधिक ५ टक्के जीएसटी देखील द्यावा लागणार आहे. म्हणजेच या डोसच्या एका लसीसाठी एकूण ९९५ रुपये मोजावे लागणार आहेत. स्पुटनिक लस लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या लसीबद्दल भारतात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
…तर स्पुटनिक लसीची किंमत होऊ शकते कमी !
भारतात या लसीची निर्मिती झाल्यास त्याची किंमत कमी होईल. भारतात सहा लसी तयार करणाऱ्या कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात आपल्याकडे आठ लसींचे २१६ कोटी डोस असतील, असा दावा डॉ. पॉल यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

