Share

‘पडळकर फालतुगिरी करायचे धंदे आमदार झाल्यावर तरी बंद करा’

Published On: 

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे १६ वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली. ‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

आता या सर्व घटनाक्रमाचे तीव्र पडसात उमटायला लागले आहेत. पडळकर यांच्यावर झोड उठवली जात आहे. संभाजी ब्रिगेडनेही या वादात उडी घेत गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटी विरोधाचे विष पिऊन काही तथाकथित गोपीचंद पडळकर सारखे आमदार हे स्टंट करण्यासाठी पुतळ्याचे अनावरण करतात, हा त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा सुद्धा अवमान आहे. जर सरकार पुतळ्याची स्थापना किंवा अनावरण करणार असेल यांच्या पोटात राजकारणाचे पिल्लू का वळवळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे’, असं म्हणत पडळकरांच्या भूमिकेचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला आहे.

‘गोपीचंद पडळकर यांना जर एवढेच पुतळा अनावरणाची घाई होत असेल तर, त्यांनी ५ वर्षात भाजपानं शब्द देऊनही धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही यासाठी सुद्धा जाब विचारला पाहिजे. फालतुगिरी करायचे धंदे त्यांनी आता आमदार झाल्यामुळे बंद करावेत’, असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी पडळकर यांच्यावर तोफ डागली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!