Share

नगरमध्ये सर्वाधिक ॲट्राॅसिटीच्या घटना त्या आधी थांबवा; नितीन राऊतांचे विखे पाटलांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं आहे. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यातचं आता सोनिया गांधी यांचा लेटर बॉम्ब आला आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतंच एक पत्र लिहिले आहे. आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे संवाद असून दबावतंत्राचा भाग नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विखेंचे कृत्य साऱ्या जगालाच माहिती आहे. ॲट्रॉसिटीच्या सर्वाधिक घटना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात असून, त्याला आळा घालण्यात अपयश आले. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसल्याचे डॉ.राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!