Share

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  भोंग्यांच्या आंदोलनामुळे आणि हाती घेतलेल्या प्रखर हिंदुत्वामुळे मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. हनुमान चालीसा आंदोलनामुळे मनसे चर्चेत आहे. आता मनसेकडून एक वेगळा उपक्रम राबवला जाणार आहे. मनसेकडून राजमुद्रा कोरलेल्या क्रिकेट बॅट वाटल्या जाणार आहेत. आता या मुद्द्यावरूनही वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. राजमुद्रेच्या विटंबनेचा मुद्दा समोर आला आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलंय. या पत्रकाद्वारे राजमुद्रेची विटंबना थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडचे महराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेच्या वतीने ५०० क्रिकेट बॅटचे वाटप करण्यात येणार आहे. मनसेच्या झेंड्यात असलेली राजमुद्रा बॅटवर कोरलेली आहे. आता त्याच बॅटने मुलं खेळणार आणि राजमुद्रेची वारंवार विटंबना होणार, असे संभाजी ब्रिगडचे म्हणणे आहे.

यापूर्वीही मनसेच्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. मागील वेळी मनसेच्या एका सभेतील फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये मनसेचे झेंडे स्टेजच्या खाली टाकलेले होते. मनसेचे आणि आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, परंतु राजमुद्रा हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. राजमुद्रेचे अशा पद्धतीने पक्षाच्या नावावर केला जाणारा अवमान योग्य नाही. राजमुद्रा हा राजकीय भांडवलाचा विषय नसून तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा मानबिंदू आहे. मनसेमध्ये असलेले माझे मित्र याचा विचार करतील ही अपेक्षा आहे, असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!