मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज स्पर्धेचा ६५वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात खेळवला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईने आतापर्यंत १२ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तळाशी आहे. दुसरीकडे हैदराबादने १२ पैकी पाच सामने जिंकले असून ते आठव्या क्रमांकावर आहे. हा सामना जिंकून हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न करेल.
आजच्या सामन्यासाठी मुंबईने मयंक मार्कंडे आणि संजय यादव यांना संधी दिली आहे. तर हैदराबादने प्रियम गर्ग आणि फजलहक फारुकीला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली आहे. मुंबई इंडियन्सकडे आता गमावण्यासारखे काही नाही आणि हा विचार मनात ठेवून संघाला आपले उर्वरित सामने खेळायला आवडेल. सनरायझर्स हैदराबादसाठी ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या टप्प्यांची गोष्ट आहे. पहिल्या टप्प्यात संघाने सातपैकी पाच सामने जिंकले होते, मात्र दुसऱ्या टप्प्यात संघाने सलग पाच सामने गमावले आहेत. आजचा सामना गमावला तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग बंद होईल. दोन्ही संघांमधील १८ सामन्यांत मुंबईने १० आणि हैदराबादने ८ सामने जिंकले आहेत.
Mumbai Indians opt to bowl
Mayank Markande and Sanjay Yadav brought in #MIvSRH #IPL2022 https://t.co/EtgwMnDPMr
— Cricbuzz (@cricbuzz) May 17, 2022
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

