Share

IPL 2022 : कॅप्टनच ठरले व्हिलन! यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात खराब कामगिरी; वाचा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम विराट, रोहित यांच्यासह इतर काही मोठ्या खेळाडूंनाही आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. असे म्हटले जाते की जो कर्णधार चांगला खेळतो त्या संघाची कामगिरीदेखील चांगली होते. कर्णधाराची कामगिरी खराब झाली तर ती त्याच्या एकट्यापुरती मर्यादित राहत नाही तर संघावर देखील त्याचा परिणाम होतो. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातदेखील असे काहीसे पाहायला मिळाले आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडू आहेत; पण आतापर्यंत हे खेळाडू चमकले नाहीत. खास करून असे खेळाडू जे संघाचे नेतृत्व करतात. यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, पंजाब किंग्जचा मयांक अग्रवाल, चेन्नई सुपर किंग्जचा एमएस धोनी, सनरायझर्स हैदराबादचा केन विलियमस यांचा समावेश होतो. या सर्वांची कमगिरी नावापेक्षा खूपच खालच्या स्तराची राहिली आहे. या कर्णधारांच्या फलंदाजीची सरासरी पहिली तर ती १८-१९ अशी आहे.

एमएस धोनी, चेन्नई सुपर किंग्ज

या हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईचे कर्णधारपद रविंद्र जाडेजाकडे सोपवले होते. मात्र पुन्हा स्पर्धेच्या मध्यावर धोनीकडे कर्णधार पदाचे नेतृत्व देण्यात आले. धोनीने स्पर्धेतील सर्व सामने खेळले आहेत. धोनीला १३ सामन्यात फक्त २०६ धावा करता आल्या. एक-दोन सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली. धोनीची कामगिरी- १३ सामने, २०६ धावा, सर्वोत्तम- नाबाद ५०, सरासरी- ३४.३३, स्ट्राइक रेट- १२८.७५

रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स

आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन असलेला मुंबई इंडियन्स संघ या हंगामात तळाशी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग ८ सामन्यात पराभव झाला. मुंबईच्या पराभवाचे आणखी एक कारण स्वत: रोहित शर्मा ठरला. त्याला हंगामात चांगली फलंदाजी करता आली नाही. रोहितची कामगिरी- १२ सामने, २१८ धावा, सर्वोत्तम- ४३, सरासरी- १८.१६, स्ट्राइक रेट- १२५.२८

मयांक अग्रवाल, पंजाब किंग्ज

मयांक अग्रवालला पंजाब किंग्ज संघाने लिलावापूर्वी रिटेन केले आणि त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले. मात्र मयांकसाठी हा हंगाम अतिशय खराब ठरला. त्याला फक्त १९५ धावा करता आल्या आणि त्याची सरासरी १७.७२ इतकी आहे. मयंकची कामगिरी- १२ सामने, १९५ धावा, सर्वोत्तम- ५२, सरासरी- १७.७२, स्ट्राइक रेट- १२५.००

केन विलियमसन, सनरायझर्स हैदराबाद

हैदराबाद संघ हंगामाच्या सुरुवातीला दोन सामने हरल्यानंतर चागली करत त्यांनी सलग काही सामने जिंकले मात्र त्यानंतर त्यांना विजय मिळवता आला नाही. यांचे कारण कर्णधार केनही आहेच त्याला मागील काही सामन्यात धावा करता आल्या नाहीत. १२ सामन्यात त्याने फक्त २०८ धावा केल्या आहेत. केन विलियमसनची कामगिरी- १२ सामने, २०८ धावा, सर्वोत्तम- ५७, सरासरी-१८.९०, स्ट्राइक रेट- ९२.८५

महत्वाच्या बातम्या: 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!