Share

‘राज्य शासनाकडून वसतिगृहाच्या कामासाठी भरीव मदत मिळवून देणार’, राज्यमंत्री बनसोडे यांची ग्वाही

Published On: 

लातूर: उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, हमाल, मापडी व व्यापारी या सर्व घटकांचे हित जपत आहे. बाजार समितीने पुढील काळात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समितीला या कामासाठी शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर तालुक्यातील वीज पडून पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या वतीने प्रत्येकी २१ हजार रुपयांची मदतीचा धनादेश राज्यमंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील होते. यावेळी बोलताना बनसोडे म्हणाले की, उदगीरच्या बाजार समितीने विकास कामाचा आराखडा तयार करून पाठवावा. आपण शासनाकडून या बाजार समितीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबावणाऱ्या या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कौतुक देखील यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी केले. सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी बाजार समितीने रस्ते, लाईट व अन्य दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत असताना सर्वांचे हित जोपासले असून कोविडच्या कामासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाला दहा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव भगवान पाटील यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!