Share

‘राज्य सरकारनं महापालिका निवडणुकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा विचार करावा’

Published On: 

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 सदस्यी प्रभाग रचनेचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. 3 सदस्यीय प्रभाग रचनेच्या विरोधात राहिलेली काँग्रेस अद्यापही 2 सदस्यीय प्रभाग रचनेवर अडून असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

महापालिका निवडणुकीसाठी 2 किंवा 4 चा प्रभाग असावा ही माझी वैयक्तीक भूमिका आहे. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीत दोनचा प्रभाग असावा असा ठराव ढाला. राज्यात माहाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे तडजोडीसाठी तीनचा प्रभाग केला असावा. असं असलं तरी महापालिका निवडणुकीत दोनचा प्रभाग करण्यासंदर्भात विचार कारावा, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण आज पुण्यात बोलत होते.

ज्यावेळी काँग्रेसनं एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला होता. तेव्हा मी बोललो की 2 किवां 4 चा प्रभाग करा. कारण चारचा प्रभाग असेल तर दोन महिला आणि दोन पुरुषांना संधी मिळू शकते. मात्र, पक्षानं भूमिका घेतली आहे. ती चूक आपणच केलेली आपण दुरुस्त करतोय. काहींनी मान्य केलं मात्र काही जणांनी तडजोड करण्यासाठी तीनचा प्रभाग केला, असं नितीन गडकरी म्हणाले.

मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेला काँग्रेसनं विरोध केलाय. आज काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या कार्यकारिणी बैठकीत आता सर्व महापालिकांसाठी 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!