Share

‘फडणवीसांनी दिल्लीतून मदत आणावी, त्यांना शाब्बासकी मिळेल’ पटोलेंचा टोला

Published On: 

मुंबई : राज्यात ओला दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे. तातडीने शेतकऱ्यांना मदत व्हावी, अशी विनंती काँग्रेसकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे. राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत द्यावी तसेच तातडीने केंद्र सरकारकडून मदत मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

राज्यातील विरोधी पक्ष राजकारण करत आहे. गुजरातला मदत केली जाते तर मग महाराष्ट्राला का नाही? यामध्ये राजकारण केले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून जास्त मदत आणावी, त्याला आम्ही राजकारण म्हणणार नाही उलट त्यांना शाब्बासकी मिळेल असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी पटोले यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाना साधला आहे. संजय राऊत यांनी सलग दोन दिवसांपासून काँग्रेसची अवस्था सामना अग्रलेखातून मांडली आहे. यावरच काँग्रेसला काय करावं काय नाही हे माहित आहे. संजय राऊत संपादक आहेत. त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. पण हेच मत त्यांनी मोदी सरकारबाबतंही मांडावं, देश बर्बाद होत चालला आहे. असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!