🕒 1 min read
मुंबई: पंजाबमधील राजकीय घडामोडीवर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेले ‘सामना’ अग्रलेखातून यावर आपली भूमिका मांडली आहे.
काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील, पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरटय़ा मारण्याचे उद्योग सुरू आहेत. पंजाबात सध्या जे घडवले जात आहे ते प. बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडविण्याचा प्रयत्न होतच असतो. प. बंगालात भाजप विरोधी पक्षात आहे. तेथेही अनेकदा लोकप्रिय सरकारला डावलून केंद्राचे लोक विरोधी पक्षाला चर्चेसाठी बोलावतात. विरोधी पक्षाच्या सूचनेनुसार प. बंगालसंदर्भात निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे लोक ऊठसूट दिल्लीस जातात व राज्याच्या बाबतीत केंद्राचे कान भरतात. जणू विरोधकांचे नित्यनेमाने दिल्लीत डोहाळे जेवणच असते. असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
नाराजी ही सर्वच पक्षांत असते. फक्त वरचे नेतृत्व किती प्रबळ आहे यावर ‘पळवापळवी’चे माप ठरलेले असते. इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर कॅ. अमरिंदर यांची असे काही करण्याची हिंमत झालीच नसती. आज मोदी व शहांच्या हाती सत्ता आहे म्हणून मूठ घट्ट आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱया म्हातार महामंडळाने ‘जी-23’ नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाटय़ावर आणत आहेत. राहुल गांधींनी देशातील ‘जनतेचा आवाज’ बनू नये, असाही या म्हातार महामंडळाचा आग्रह असतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. त्यांनी नवज्योत सिद्धूसारख्या येडबंबूच्या नादालाही लागू नये. काँग्रेस पक्षात जुने भरवशाचे लोक म्हातारचळ लागल्याप्रमाणे वागत आहेत, तर सिद्धूसारख्या लोकांचे चित्त ठिकाणावर नाही. पंजाबातील काँग्रेसचा उरलासुरला पायाही हे येडबंबू खतम करतील. असा इशाराही सामनातून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पुण्यातील काजत्र प्राणीसंग्रहालयातील प्रियदर्शनी वाघिणीचे निधन!
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- विजय वडेट्टीवारांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव अभियानास’ सुरुवात
- ‘आपण विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज’
- तुमचं राजकारण जरुर होईल पण त्यामधे शेतकऱ्याचा बळी जाईल; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
