Share

गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारची नियमावली जाहीर !

Published On: 

मुंबई : गुढीपाडव्या दिवशी परंपरेनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी प्रभात फेऱ्या, बाईक रॅली, शोभा यात्रा यातून महाराष्ट्राच्या परंपरेचं दर्शन घडत असतं. मात्र, राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्व धर्मियांच्या सणांवर-उत्सवांवर सावट निर्माण झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढत असून आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत आहेत.

त्यामुळे, गेल्या वर्षी साधेपणाने सर्व सण-उत्सव साजरे करण्यात आले होते. आता, गुढीपाडव्यानिमित्त देखील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत साधेपणाने हा सण साजरा करावा. बाईक रॅली, मिरवणुका यांना बंदी घालण्यात आली असून पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये. तसेच, असं देखील सरकारने सांगितलं आहे.

गुढीपाडव्यानिमित्त नियमावली –

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.

सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे.  घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.

गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असं आवाहन राज्य शासनाद्वारे करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!