मुंबई : राज्यासह देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी गेले अनेक दिवसांपासून करत होते.
याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक आज घेण्यात आली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. या बैठकी दरम्यान मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी व बारावीच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिकृत माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावीची परीक्षा मे महिनाच्या अखेरीस तर दहावीच्या विद्यार्थ्यांची जून महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. या निर्णयाचं स्वागत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केलं आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचं मी स्वागतच करेल असं टोपे म्हणाले आहेत. ‘जान है तो जहान है किंवा सर सलामत तो पगडी पचास, परीक्षा आज नाही तर उद्या होतील किंवा सगळ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय देखील होऊ शकतो, त्याबाबत मी आग्रह केला होता’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केल. ‘परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे मी स्वागत करतो, असं राजेश टोपे म्हणाले. सध्या तरुण वर्गात कोरोना संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. 10 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मी सुद्धा आग्रह केला होता. अशावेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असेल तर मी त्याचं स्वागत करतो,’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुढचे पंधरा दिवस महत्वाचे, जाणून घ्या अजित पवारांचा ऍक्शन प्लॅन !
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन, नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

