वैजापूर : जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलिस महासंचालक मलिकार्जून प्रसन्ना व ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी गुरुवारी (दि.२९) शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर, गायकवाड वाडी येथील कोविड केअर सेंटर आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी येथील तिन्ही ठिकाणच्या सोयीसुविधांची पाहणी करुन तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. तालुक्यातील जनतेला ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
येथील रुग्णांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या सुचनांप्रमाणे डॉक्टरांशी समन्वय करुन त्याच ठिकाणी त्यांच्या सुचनांचे निरसन केले. तसेच तेथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत आणि अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
त्यांनी प्रथम शहरातील ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी होते की नाही याचा आढावा घेण्यासाठी येवला रोड वरील जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आलेली नाकाबंदी लावण्यात आलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
नंतर उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर ला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तेथील पूर्ण परिसर आणि व्यवस्थेची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. रुग्ण,डॉक्टर तसेच इतर कर्मचारी यांचा भाग स्वतंत्र ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश देत तेथील सर्व यंत्रणा उत्तमरीत्या काम करत असून घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आ. प्रा. रमेश पाटील बोरनारे व नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत समस्या मांडल्या त्यावर जिल्हाधिकारी यांनी येत्या दोन दिवसांत वैजापूर येथे ऑक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात येईल. त्या प्रकल्पात ऑक्सिजन निर्मिती करून १२५ ऑक्सिजन सिलेंडरचा साठा करण्याची क्षमता असेल त्या उभारलेल्या प्रकल्पामुळे तालुक्यातील जनतेला ऑक्सिजनचा तुटवडा भासवणार नाही असे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ प्लस, उद्या होणार शुभारंभ! मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरणाचा पार पडणार सोहळा
- ‘उद्धवजी, आपण फक्त मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा करतो’
- सकारात्मक! लातूर मधल्या या आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात
- १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण, जिल्हयासाठी हव्यात २० लाख लसी!
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा २३ वा दिक्षांत समारंभ ४ मे रोजी


