Share

परभणी येथील पहिली ते दहावीच्या शाळांना १ मे – १३ जूनपर्यंत सुट्ट्या जाहीर 

Published On: 

🕒 1 min read

परभणी : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २०२१ – २०२२ या शैक्षणिक वर्षात १ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १३ जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी ग्राह्य धरावा, पुढील शैक्षणिक वर्षात १४ जून पासून शाळा सुरु कराव्यात, असे आदेश शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी शुक्रवारी काढलेल्या पत्रकाद्वारे दिले आहेत.

शाळातून उन्हाळ्याची, दिवाळीची सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सवात, नाताळासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या परवानगीने देण्यात येत आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२. २ नूसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्यासंदर्भात कोरोना ( कोविड १९) बाबत तत्कालीन परिस्थिती विचारात घेवून शासनस्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील, ते परिस्थितीनुसार संचालनालयाकडून सांगण्यात येणार आहेत, असेही या वेळी म्हटले आहे. कोराेनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. विनामास्क फिरु नये, तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. सॅनेटायझरचा वापर नियमीतपणे करावा. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर देखील पडू नये.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!