Share

शाळा सुरू, पण कोरोनाच्या त्रिसुत्रीचे पालन करा; लातूरच्या देशीकेंद्र शाळेत राज्यमंत्र्यांचे आवाहन

Published On: 

लातूर : मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. शासनाने आजपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. पुन्हा एकदा शाळेमध्ये किलबिलाट सुरू झाला आहे. व शाळा पुर्ववत सुरु करण्यात आलेल्या आहेत. लातूर शहरातील देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्यालय व ग्लोबल नोलेज पब्लिक स्कूल येथे राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचे पालन करून शाळा सुरु ठेवाव्यात जेणे करून कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मकरंद सावे यांची या वेळी उपस्थिती होती. शालेय विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत शाळांमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी या माध्यमातून १०० टक्के मुलांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. तर काहींच्या मते शाळा अद्याप सुरू करण्याची घाई करायला नको होती. या सर्व माध्यमातून सध्या आठवी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!