Share

मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप मविआ सरकारच्या माथी कसे?

Published On: 

मुंबई : मराठा समाजाला राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टीकले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यात एकमेकांवर आरोप करण्याची स्पर्धा सुरू आहे. यातच आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि केंद्र सरकारवर आरोप केले आहे. मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप केंद्र सरकार आणि मोदी यांचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, गायकवाड आयोग फडणवीस यांनी नेमला आहे. तर कायदा देखील फडणवीस यांनीच केला आहे. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकीलही फडणवीस यांनीच नेमले आहेत. १०२ वी घटना दुरुस्ती मोदींनी केली, त्यामुळे राज्यांचे आरक्षण देण्याचे अधिकार संपुष्टात आले असे असताना मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारच्या माथी कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

या संदर्भात सचिन सावंत यांनी म्हटले की, ‘मोदी सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार संपुष्टात येत नाही हे संसदेला सांगितले पण सर्वोच्च न्यायालयात टाळाटाळ का केली? इच्छा नव्हती का? आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे. आरक्षणाची शिफारस राज्य सरकार करेल. कमिशन नेमून राष्ट्रपतींकडून मोदींनी शिक्कामोर्तब करावे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!