Share

संतपीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणारा अभ्यासक्रम सुरू करा- उद्योग मंत्री

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : संतपीठाच्या माध्यमातून समाजात विविध सांप्रद्रायातील संस्कृती आणि संताची शिकवण समाजापर्यंत पोहचवून सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्त्व घडवण्याबरोबरच रोजगार निर्मित्तीसाठी आवश्यक असलेल्या विविध अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. संतपीठाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठ हे समाजाभिमूख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत केले.

मंत्री देसाई म्हणाले की, संतपीठ स्थापन होण्याचा ध्यास संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा होता. तो पूर्ण होत असल्याचा आनंद होत असून संतपीठात शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा उपयोग रोजगार आणि शांतता व सौहार्दपूर्ण समाजजीवन घडवण्यात महत्त्वाचा वाटा असणार आहे. संतपीठाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्धतेसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार सुशोभिकरण आणि विविध उपक्रमांचे संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देसाई यांनी आढावा घेतला.

या बैठकीत सुरुवातीला संतपीठाच्या कार्याचा आढावा डॉ.प्र वीण वक्ते यांनी सादर केला. या बैठकीस आमदार अंबादास दानवे, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव जयश्री सोमवंशी, डॉ. प्रवीण वक्ते, पर्यटन विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजेश रगडे, नाट्यशास्त्र विभागाचे डॉ. जयंत शेवतेकर यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!