Share

राणे-ठाकरे एकाच मंचावर; शेजारी बसूनही एकमेकांकडे पाहिलेही नाही

Published On: 

सिंधुदुर्ग : बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे , उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

उद्घाटनासाठी तब्बल १६ वर्षांनी एकाच मंचावर, शेजारी-शेजारी खुर्चीवर बसून देखील राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांना अनुभवायला मिळत आहे.

दरम्यान, ठाकरे आणि राणे जवळपास १६ वर्षांनी एकाच मंचावर येत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्यातले राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. पण आज कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राणे-ठाकरे आपल्यातल्या वाद बाजूला ठेऊन एकमेकांना बोलतील, चर्चा करतील. कमीत कमी एकमेकांना पाहून नमस्कार तरी करतील, अशी शक्यता होती. मात्र,तसे काहीच झाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!