Share

“मुख्यमंत्री सहा महिने घराबाहेरच न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला”, रावसाहेब दानवेंचा टोला

Published On: 

जालना: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ६ महिन्यापासून घराबाहेरच निघाले नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला त्यामुळे याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जालन्यात दूधनवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांची डबा पार्टी पार पडली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे म्हटले. तसेच यावेळी त्यांनी मनोज वाजपेयी यांचा व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी ट्विटवर करारा जवाब मिलेगा असा ईशारा दिला होता, यावरही प्रतिक्रिया दिली आहे. दानवे यांनी म्हटले की, “जो घोटाळेबाज मंत्री असेल त्यावर ईडी कारवाई करेलच, त्यामुळे हम दुगणा करारा जवाब देंगे.”

तसेच मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज आमरण उपोषणाला बसले आहेत. यावरही प्रतिक्रिया देत दानवे म्हणाले की, “भाजपचं सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण या सरकारला तेही टिकवता आलं नाही. सरकारने संभाजीराजेंना आश्वासन देऊनही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केलं, आणि आमचा या उपोषणाला पाठिंबा आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!