नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असून रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. याची अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध होत आहेत. यातूनच तेथील परीस्थिती समजून येत आहे. दरम्यान युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सोशल मीडियावर अमेरिकेचा ९/११ हल्ला आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यांची तुलना करणारे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (World Trade Centre) ट्विन टॉवर्सवर ९/११ च्या दहशतवादी हल्ला झाल्याचे दिसत आहे. तर बाजूला कीवमधील रशियन हल्ल्यादरम्यान, क्षेपणास्त्राचा हल्ला झाल्यानंतर एक कोसळताना इमारत दिसत आहे. सोबतच #StopRussia वापरण्यात आले आहे.
#StopRussia pic.twitter.com/8PpWXFhnss
— МВС України (@MVS_UA) February 26, 2022
दरम्यान रशियन लष्कराने युक्रेनमधील ८२१ लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. १४ विमानतळ आणि १९ लष्करी कमांड सेंटरसह लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले असून २४ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालींसह अनेक ड्रोन आणि रणगाडेही नष्ट करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरेंची नियुक्ती
- “मी या देशाचा पंतप्रधान बनून दाखवतो”, अभिजित बिचुकलेंचे मोठे वक्तव्य
- Maratha Reservation : मराठा आरक्षणा संदर्भात संभाजी राजेंच्या उपोषणास अभिजीत बिचुकलेंची भेट
- दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल
- “…हे सगळं राजकारणासाठीच केलं जातंय”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल


