🕒 1 min read
यवतमाळ : परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर राज्यभर गाजलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सोशल मिडीयावर देखील या मुद्द्यावरून परब यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. मात्र सोशल मिडीयावर ठाकरे सरकारविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे एका एसटी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.
आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ आगारातील प्रविण ज्ञानेश्वर लढी यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनिल परब आणि ठाकरे सरकारविरोधात ज्ञानेश्वर लढी यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामध्ये लढी यांनी म्हटले होते की, “महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सीजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. १०० कोटी वसुली सरकार.” असा मजकूर सोशल मिडीयावर त्यांनी प्रसारित केला होता.
यानंतर एस. एस राठोड यांनी दिलेल्या अहवालानंतर लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २० जुलै रोजी लढी यांचे एसटीमधून निलंबन करण्यात आले. मात्र, त्यांना नियमांप्रमाणे निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. निलंबन कालावधीत लढी यांनी यवतमाळ आगारामध्ये दररोज हजेरी लावावी, असेही आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दु:खद! अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू नंदु नाटेकर यांचे निधन
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन

