Share

एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा; येणाऱ्या काळात बडतर्फीची कारवाई अधिक तीव्र करणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. मात्र आता औरंगाबाद विभागात कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. सोमवारी यामध्ये आणखी ५ कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. मंगळवारी कुणालाही बडतर्फ करण्यात आलेले नाही. येणाऱ्या काळात कर्मचारी रुजू झाले नाही तर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.

औरंगाबाद विभागात एकूण २२०० कर्मचारी असून यापैकी आत्तापर्यंत केवळ ८०० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. १४०० कर्मचाऱ्यांनी संपातून आत्तापर्यंत माघार घेतलेली नाही. मंगळवारी (दि.२८) विविध मार्गावर औरंगाबाद विभागातील विविध आगारांतून, ७८ बस धावल्या.  आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर १० बसच्या ३८ फेऱ्या करण्यात आल्या. यात ७८२ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद बीड मार्गावर १५ बसच्या ३० फेऱ्या केल्या.

औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ५ बसने १६ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर २ बसच्या ८ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ६ शिवशाही बसच्या १२ फेऱ्या, औरंगाबाद-पुणे मार्गावर १३ शिवशाही बसच्या १३ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ४ बसने ८ फेऱ्या करण्यात आल्या. अजिंठा येथे ८ बसच्या १३८ फेऱ्या धावल्या. २६६५ पर्यटकांनी प्रवास केला. सोमवारी एकूण ७८ बसच्या ३१७ फेऱ्या झाल्या. तर यातून ६११६ प्रवाशांनी प्रवास केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!