औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठांना स्मार्टकार्ड काढण्यास विलंब होत होता. अनेक ज्येष्ठ या योजनेपासून वंचित होते. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी एसटीच्या सर्व विभागांना दिले आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये ३३ टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटी महामंडळाने यापूर्वीच सुरु केलेली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ यापासून वंचित राहिल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत देण्यात आली आहे. तसेच सदरची देण्यात येणारी मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे याबाबतची कल्पना ज्येष्ठ नागरिकांना देण्यात यावी, असे वाहतूक महाव्यवस्थापकांनी पत्रात नमुद केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ज्या भागात एसटी बस सुरु असतील त्या भागांमध्ये नागरिकांना प्रवासाकरता सध्याची प्रचलीत असलेली ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येऊन प्रवासाची मुभा देण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
