Share

एसटी प्रशासनाचा संप मोडण्यासाठी विविध क्लुप्त्या; कर्मचारी मागण्यांवर ठाम!

Published On: 

औरंगाबाद : विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजून पर्यंत कुठलाही तोडगा निघालेला नाही. तसेच परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांची वर्णी लावणार असल्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र याचा आमच्या संपावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे औरंगाबादेतील एसटी कर्मचारी संघटनेद्वारे सांगण्यात आले. एसटी प्रशासन संप मोडण्यासाठी विविध क्लुप्त्या आखत आहे. मात्र याचा परिणाम संपावर झालेला नाही.

संपावर असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महामंडळाने २४ तासात हजर होण्याचे आदेश दिले होते. जर कर्मचारी २४ तासात हजर झाले नाही तर सेवा समाप्तीची कारवाई केली जाईल अशी नोटीस मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी यांत्रिकी विभागातील पाच कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी याव्यतिरिक्त एकही कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. अशी माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली.

एसटी संपाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने एसटी प्रशासनाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे. आत्तापर्यंत मंडळाने कारवाईचा बडगा उगारत विभागातील ५४ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तसेच प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचा विचार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतरही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!