Share

ठरलं तर ! ‘या’ महिन्यात होणार दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा लांबणीवर जाणार असल्याचे म्हटले जात होते. मार्चमध्ये होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या पूर्वी घेणे शक्य नसल्याचे शिक्षणविभागाकडून सांगण्यात आले. दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेचच शाळा सुरू करण्याचा विचार असून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालंय बंदच होती. ऑनलाइन पद्धतीनं राज्यात शिक्षण दिलं जात आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!