Share

IPL : कोण देणार मुंबईला टक्कर? बेंगलोर आणि हैद्राबादमध्ये ‘करो या मरो’ सामना !

Published On: 

युएई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. कालच्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामान्यमध्ये मुंबईने दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दिल्लीच्या संघाला अजून एक संधी असली तरी आज होणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यातील सामना मात्र अत्यंत महत्वाचा आहे.

आज बेंगलोर आणि हैद्राबादमध्ये ‘करो या मरो’ सामना होणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफायर २ मध्ये दिल्लीशी सामना करेल. तर, आजचा सामना जो संघ हरेल त्या संघाचं यंदाच्या आयपीएल सत्रातील आव्हान संपुष्टात येईल.

काल, दिल्लीने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. मात्र, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांचा डोंगर रचून दिल्ली समोर कडवं आव्हान उभं केलं. यानंतर, दिल्लीच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली आणि तब्बल 57 धावांनि विजय मिळवत मुंबईने अंतिम सामन्यात धडक मारली. आज, जो संघ जिंकेल त्याचा सामना दिल्लीशी होईल. यानंतर, दिल्लीसोबतच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ आयपीएलच्या विजेतेपदासाठी मुंबईशी झुंज करेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!