मुंबई : कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालंय बंदच होती. ऑनलाइन पद्धतीनं राज्यात शिक्षण दिलं जात आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा लांबणीवर जाणार असल्याचे म्हटले जात होते. मार्चमध्ये होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या पूर्वी घेणे शक्य नसल्याचे शिक्षणविभागाकडून सांगण्यात आले. दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेचच शाळा सुरू करण्याचा विचार असून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- खोट्या खेलो इंडिया जाहिरातीद्वारे अनेक खेळाडूंना फसवल्याप्रकरणी एफआयआर दाखल
- राज्यपाल चांगली व्यक्ती ते प्रस्तावाला विरोध करणार नाहीत – भुजबळ
- IPL : कोण देणार मुंबईला टक्कर? बेंगलोर आणि हैद्राबादमध्ये ‘करो या मरो’ सामना !
- मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांची पायी दिंडी; पंढरपुरात संचारबंदी लागू
- महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

