नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.
यावरच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगावला आहे. राज्यपाल चांगली व्यक्ती आहे. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नावांच्या प्रस्तावाला विरोध करणार नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत. काही पक्षांची नावेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आहेत, असा गौप्यस्फोट देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.
महत्वाच्या बातम्या
- महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष – उद्धव ठाकरे
- मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद
- कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष व्हाव्या म्हणून तामिळनाडूतील गावात धार्मिक विधी !
- मराठा क्रांती मोर्चा काढणार पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा ; आरक्षणासाठी आक्रमक
- शेतकरी विरोधी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही : कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

