हैदराबाद: पुसारला वेंकटा सिंधू म्हणजेच भारतीय बॅडमिंटन पटू पी. व्ही. सिंधू सिंधू हिने 2016 सालच्या रिओ दि जानेरो येथे झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटांमध्ये रौप्यपदक पटकावले होते. तसेच ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटन मध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी आणि सुवर्णपदक मिळवणारी देखील ती पहिली भारतीय ठरण्याचा मान देखील केली पटकावला आहे. तर सध्या कोरोनाच्या काळात क्रीडा विश्वावर अनेक निर्बंध आले असताना खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्ती संदर्भात समस्या निर्माण होण्याचं शक्यता निर्माण झाली आहे.
यासाठी आपल्या शरीराच्या पोषण आणि तंदुरुस्तीवर काम करण्यासाठी आपण काही दिवसांसाठी लंडनला जात असल्याचं सिंधू हिने ट्विट करत सांगितला आहे. लंडनमधील एका स्पोर्ट्स सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये ती आपल्या तंदुरुस्तीवर काम करणार असून पुढील काय आठवड्यांसाठी ते लंडनमध्ये असणार आहे. तर हा माझ्यासाठी कामाने सुधारणा करण्याचा चांगली संधी असल्याचं देखील तिने सांगितलं.
तर यावेळी सिंधू लंडनला तिच्या कौटुंबिक कारणांमुळे जात असल्याची चर्चा माध्यमात झाल्यानंतर यावर देखील तिने ट्विट करत माझ्या लंडन जाण्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. तसेच माझे प्रशिक्षक गोपीचंद यांच्या बद्दल देखील काही वाद नसल्याचं सांगत तिने याबद्दल मी कायदेशीर तक्रार करू शकते असे देखील म्हटलं.
महत्वाच्या बातम्या
- आमिर खानचा मुलगा सिनेमाच्या ऑडिशन मधून रिजेक्ट !
- दोन महिन्यांपूर्वी चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झालेल्या संजय दत्त यांची कर्करोगावर मात
- ‘मी या वयात इतकं फिरतोय, तू किमान बाहेर तरी पड…’ असं पवारांना म्हणायचं असेल : पाटील
- श्री तुळजाभवानी देवीची आज रथ अलंकाराने महापूजा
- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महादेव जानकरांचा पक्ष आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

