परभणी : राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या पुढाकारातून कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन अण्ड वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून शनिवारी कोरोना मदत केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.
या मदत केंद्रामधून जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना संसर्गातून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी कशी करावी, संसर्ग झाल्यास काय करावे, लॅब टेस्टींग आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे काम करण्यात येणार आहे.
या सोबतच या कोरोना मदत केंद्राद्वारे दोन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच मोबाईलवर मिळणाऱ्या एसएमएसवरुन कोरोना रुग्णाची माहिती संगणकीय स्वरूपात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्या व्यक्तीवर उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांच्या मदतीकरिता पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान काही अडचण येत असल्यास किंवा वेळेवर उपचार न मिळणे, ऑक्सिजन, रेमडीसीव्हीर इंजेक्शनची अडचण येत असल्यास तसेच रुग्णालयात बेड व अॅडमिशन बाबत समस्या येत असल्यास नागरिकांना संपर्क करता येईल. त्या नागरिकांना मदत केंद्राद्वारे सहकार्य केले जाईल. खासदार डॉ.फौजिया खान यांच्या नेतृत्वात कोरोनाशी संबंधीत सेवा,सुविधा तातडीने व योग्य रितीने मिळण्यासाठी केंद्राद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. रुग्णाची हॉस्पिटलमधून सुट्टी होईपर्यंत मदत केंद्राकडून उपाचारासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
अॅडमिशन बाबत समस्या येत असल्यास नागरिकांना संपर्क करता येईल. त्या नागरिकांना मदत केंद्राद्वारे सहकार्य केले जाईल. खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वात कोरोनाशी संबंधीत सेवा, सुविधा तातडीने व योग्य रितीने मिळण्यासाठी या केंद्राद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. रुग्णाची हॉस्पिटलमधून सुट्टी होईपर्यंत मदत केंद्राकडून सहकार्य करण्यात येणार आहे.
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास

