🕒 1 min read
बीड :- औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक-2020 चे मतदान दि. 01 डिसेंबर 2020 (मंगळवार) रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा. पर्यंत व मतमोजणी गुरवार दि.03 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेची पदवीधर व शिक्षक मतदार संघातील द्विवार्षिक निवडणूक असलेल्या राज्यातील महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदर नैमित्तिक सुट्टीबाबत निर्देश दिले आहेत.
या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची दिनांक 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा द्यावी, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप आयुक्त सामान्य प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपात कामाची कदर नाही,राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेतोय : जयसिंगराव गायकवाड
- ‘मंदिर विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही,पण निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही’
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल’
- भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या गायकवाड यांचे पक्षात स्वागत- जयंत पाटील

