🕒 1 min read
अमरावती : मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढे यावे म्हणून राज्याचा निवडणूक विभाग अनेकानेक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्याच्या १६ तारखेला सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेतली जाईल. शिवाय कुणाचेही नाव गाळण्यापूर्वी त्याला तीनवेळा नोटीस जारी करुन तो राहतो, त्याच्या पत्याचा पंचनामा केला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती येथे दिली.
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी गुरुवारी येथे यंत्रणांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या आणि त्यापैकी मतदार यादीत नोंद असलेले मतदार याचे प्रमाण नेहमी व्यस्त असते. तात्पर्य असे की अनेक नागरिक पात्र असतानाही स्वत:चे नाव मतदार यादीत नोंदवित नाहीत.
त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. महाविद्यालयीन स्तरावर नोंदणी शिबिरे, पथनाट्ये व पत्रकांच्या आधारे नागरिकांमध्ये जनजागृती, विशिष्ट व्यक्तींची आयकॉन म्हणून नियुक्ती, त्यांच्या उपस्थितीत सभा-बैठकांचे आयोजन, मतदारांशी थेट संवाद, राजकीय पक्षांच्या बैठका आदी कार्यक्रम घेतले जातात. परंतु तरीही अनेक नागरिक स्वत:ला मतदार म्हणून नोंदवून घेत नाहीत.
हा पूर्वानुभव लक्षात घेता १ जानेवारी २०२२ ही अर्हता दिनांक मानून नोव्हेंबर महिन्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी १३, १४ व २७, २८ नोव्हेंबरला विशेष शिबिरे आयोजित करुन त्यादिवशी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी केली जाईल. मतदार नोंदणीसाठी तरुणांमध्ये उत्साह निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यभरातील विद्यापीठांशी संपर्क करणे सुरु असून काही विद्यापीठांनी होकार दर्शविल्याचेही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘जागर लोकशाहीचा’ नावाचा कार्यक्रम सुरु करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणांकन केले जाईल. त्यामुळे आपोआपच मतदार नोंदणीला गती मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला-धनंजय मुंडे
- ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार
- लालबागेतील आगीला व्यवस्थापन जबाबदार, महापौर किशोरी पेडणेकर
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

